top of page
  • Facebook

चौकटीबाहेरचा राजा

२/२०/२०२५

श्री अमोल भागवत

:


अमेरिकेत राहून , आपल्या अंगवळणी पडलेल्या अनेक सवई लोप पावतात, त्यातलीच एक सवय म्हणजे रविवारी निवांतपणे पेपर वाचणे. त्या दिवशी पेपरलाही डिमांड असायची आणि म्हणुनचं की काय रविवारी अनेक पुरवण्या असत. 😉

लोकसत्ता लोकरंग पुरवणी - रविवार चा पेपर कोण कोण वाचायचे?
लोकसत्ता लोकरंग पुरवणी - रविवार चा पेपर कोण कोण वाचायचे?

अश्याच कुठल्याश्या रविवारी लोकरंग ची पुरवणी हाताळताना, “अनुदिनी” लेख वाचला. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होणारे संभाषणच होते ते, अगदी प्रत्येक घरात होते तसेच.


दिवसेंदिवस ही लेख मालिका त्यातील आई , बाबा, भाऊ, बहिण आणि आजोबा , त्यातील संभाषण आणि आजुबाजुला घडणाऱ्या घटनांवर येणारी त्यांची प्रतिक्रिया ह्यामुळे रविवारच्या पेपर वाचनाचा अविभाज्य भाग बनला.काही महिन्यांनी ह्या लेख मालिकेने रजा घेतली.


अचानक, एका शुक्रवारी टीव्हीवर नवीन मराठी मालिका सुरू झाली . मालिकेच्या टायटल सॅांग मधेच “अनुदिनी” चा उल्लेख होता. मालिका त्यातील शेखर, श्यामला, शिर्या, शलाका आणि टिपरे आजोबांमुळे थोड्याच कालावधीत लोकप्रिय झाली.

Dilip Prabhavalkar - The Marathi Theatre Legend in a popular Marathi serial - श्रीयुत गंगाधर टिपरे
Dilip Prabhavalkar - The Marathi Theatre Legend in a popular Marathi serial - श्रीयुत गंगाधर टिपरे

अनेक सिनेमे, नाटके आणि मालिकांमधून दिसणारे आमचे टिपरे आजोबा आमच्या शहरात येणार हे कळले आणि त्याच निमित्ताने केलेला हा ब्लॅागप्रपंच.


5 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Rated 5 out of 5 stars.

Watched this serial multiple times, pure entertainment, nice to watch anytime.

Like

Mandar Pathak
Mandar Pathak
Feb 21
Rated 5 out of 5 stars.

खूप छान आठवण, अमोल. मग सध्या रविवारी काय करतोस? 😁😁😁 jokes apart, can’t wait to see him performing live after a while, right here in St. Louis.

Like
Amol Bhagwat
Feb 21
Replying to

Thank you. Sunday is Runday now..😀. Really excited for “Patro-Patri”

Like

Rated 5 out of 5 stars.

Loved that Serial gangadhar tipre !!! this blog brought back golden memories of the Sunday spent in those days back in India

Like
Amol Bhagwat
Feb 21
Replying to

Glad you liked it and took back into those golden memories 🙏🏻

Like
bottom of page