top of page
  • Facebook

२०२५ ची सुरुवात होताना...

Typical winter day - St. Louis Gateway Arch National Park
Typical winter day - St. Louis Gateway Arch National Park

२/१०/२०२५

सौ आरती अत्रे-कुलकर्णी

:

नमस्कार सेंट लुईस वासियांनो,


२०२५ सुरु होताहोताच ब्लेअर हे हिवाळी वादळ अटलांटिक महासागरात गेल्यानंतर वादळाचे बहुतेक परिणाम ६ जानेवारीपर्यंत संपले. त्या वादळामुळे सेंट लुईसवासीय अगदीच गारठून गेले. अजूनही काही ठिकाणी त्या बर्फाचे ढीग दिसताहेत. शाळा, कॉलेजेस विंटर व्हेकेशननंतर सुरु झाली खरी, पण विंटर डे मिळत मिळतच! थंडी तर अजूनही जातच नाहीये. त्यामुळेच थंडीसोबतच शाळा कॉलेजेस आणि अनेक ठिकाणी कोल्ड, फ्लू, कफ ह्यांची साथ दिसत आहे. तब्येतीची काळजी सगळ्यांनी घ्या.


जानेवारी संपताना अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी शपथ घेतली आणि त्याआधीपासूनच येथे रहात असलेल्या भारतीयांमध्ये गोंधळ निर्माण झाला. "बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करणे" ह्या धोरणाचा अनेक प्रकारे भारतीयांवर परिणाम झाला. बहुतेक भारतीय येथे कायदेशीर रहात आहेत, ह्या आजवरच्या मान्यतेला छेद गेला.


जे स्टुडन्ट भारतामधून शिक्षणासाठी येथे येतात ते बेकायदेशीर कामे करून पैसे मिळवत असतात, त्यांनी हे काम करणे बंद केले. (बहुतेक करून असे स्टुडन्ट भारतीय दुकाने, हॉटेल्स येथे काम करीत होते.) वरखर्चाला मिळणारे पैसे बंद झाले.


ज्यांचे व्हिसा काही दिवसापुरते राहिलेले होते किंवा पुन्हा रिन्यू होण्याची शक्यता नव्हती असे अनेकजण पुन्हा भारतात जाण्याची तयारी करायला लागलेले आहेत. इतकेच नाही तर ज्यांना आता भारतामध्ये काही काळासाठी जायचे आहे तेदेखील कायदेशीररित्या परत येणे कसे शक्य आहे, ह्याचा विचार करूनच तिकीट काढत आहेत. ह्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही होणार, हे नक्कीच!


ह्यामध्ये फारसा सगळ्यांशी संबंधित नसलेला आणि अगदीच ०.१ किंवा ०.२% मध्ये असलेला भारतीयांचा प्रश्न बाळाच्या जन्मानंतरच्या अमेरिकन नागरिकत्वाशी आहे.


ह्यावर्षी आपल्या मराठी मंडळाचा संक्रांत इव्हेंटला तुम्ही आला होतात का? अर्थात हा प्रश्न महिलांसाठी आहे. अश्या थंडीमध्ये मैत्रिणींना भेटणे, फोटो काढणे आणि एकत्र मजा करणे ह्यासारखे उबदार काही नाही. ह्याशिवाय अश्या ठिकाणी बहुतेक सर्व ओळखीचे भेटतात आणि हालहवाल विचारली जाते. छान वाटते. तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते, मराठी मंडळाने मराठी म्हणींवर छान खेळ घेतला. त्यानिमित्याने जुन्या नव्या म्हणी पुन्हा एकदा कानावरून गेल्या.


मार्च १ पर्यंत रोज बोटॅनिकल गार्डन ला Orchid Show आहे, नक्की पहा.


८ मार्च ला Kool Tunez तर्फे Live orchestra होणार आहे, महात्मा गांधी सेंटर येथे. ह्यामध्ये सेंट लुईसमधील लोकल आर्टिस्ट सहभागी असून त्यांनीच मिळून हा orchestra बनविलेला आहे. तिकीट आहे 5$ आणि वेळ आहे 6.30pm, जमल्यास नक्की जा.


ANHEUSER-BUSCH BREWERY येथे अनेक इव्हेंट्स आयोजित केलेले आहेत. थंडीमध्ये indoor काहीतरी करायला काहीच हरकत नाही, हो ना?


Daffodils, Hyacinth ह्यांचे हिरवेगार कोंब मातीमधून बाहेर येताना दिसत आहेत. तुम्हाला माहिती आहे, ह्या पेरेनिअल रोपट्याना 'Rebirth and New beginning' चे प्रतीक मानले जाते. ती रोपे आपल्याला सांगत असतात, थंडीनंतर वसंतऋतू येणार, झाडे पुन्हा बहरणार, फुलणार...


आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे वसंतपंचमी/श्रीपंचमी/ज्ञानपंचमी म्हणजे वसंत ऋतूचा पहिला दिवस होय. त्यादिवशी देवी सरस्वती हिचा जन्मदिवस आणि कामदेव ह्यांचाही जन्मदिवस आपण साजरा करतो.


/*या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता*/

/*या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।*/

/*या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता*/

/*सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥*/


अर्थ - अगस्तीमुनींनी केलेल्या सरस्वती स्तोत्रामधील २१ श्लोकांमधील हा पहिला श्लोक. चमेलीच्या/कुंदाच्या फुलांसारखी पांढरेशुभ्र, मोत्याची चमक असलेली आणि शुद्ध पांढऱ्या कपड्यांसह जी संरक्षित आहे, जिने एका हातात वीणा आणि दुसरा हात वरदानाचा उचलला आहे, जी पांढऱ्या शुभ्र कमळावर बसलेली आहे, भगवान ब्रह्मा, भगवान अच्युता (विष्णू), शंकर आणि इतर देवतांनी सदैव जिचे उपासना करतात, अशी हे सरस्वती देवी, कृपया माझे रक्षण करा आणि माझे अज्ञान पूर्णपणे काढून टाक.


भेटूयात पुन्हा!

6 comentários

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
Avaliado com 5 de 5 estrelas.

खूपच छान आरती !!

Looking forward to read many more blogs from you which are informative and also giving us some very good thoughtful insights 👌👌

Editado
Curtir

Ashish Raje
12 de fev.
Avaliado com 5 de 5 estrelas.

Super job Arti, well done!

Curtir

Avaliado com 5 de 5 estrelas.

Nice summary of events!! 👏 keep writing Aarati

Curtir
Arti Kulkarni
Arti Kulkarni
11 de fev.
Respondendo a

Thank you so much!

Curtir

Mandar Pathak
Mandar Pathak
10 de fev.
Avaliado com 5 de 5 estrelas.

खूपच छान लिहिले आहेस, आरती. सेंट लुइस मराठी मंडळाची पहिली वहिली ब्लॉग writer बनण्याबद्दल हार्दिक अभिनंदन :) आणि धन्यवाद!

Curtir
Arti Kulkarni
Arti Kulkarni
11 de fev.
Respondendo a

मंदार, तुझ्या प्रोत्साहनामुळेच मी ‘पहिली वहिली ब्लॉग writer’ होऊ शकले.

Curtir
bottom of page