पत्रा पत्री!
March 14, 2025 (Time: TBD)
|Location: TBD
पत्र लिहण्यास कारण कि २०२५ च्या हिवाळ्यात, St Louis Marathi Mandal घेऊन येत आहे एक मजेदार, उबदार नाटक, पत्रा पत्री!
Time & Location
March 14, 2025 (Time: TBD)
Location: TBD
About the event
स.न.वि.वि.
पत्र लिहण्यास कारण कि २०२५ च्या हिवाळ्यात, St Louis Marathi Mandal घेऊन येत आहे एक मजेदार, उबदार नाटक, पत्रा पत्री! Texting आणि Chatting च्या जमान्यात एकमेकांना पत्र लिहणाऱ्या दोन मित्रांची गोष्ट अतिशय खुसखुशीतपणे रंगमंचावर सादर होते. अष्टपैलू कलाकार, दिलीप प्रभावळकर यांनी लिहलेल्या पुस्तकाचा नाट्याविष्कार विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केला आहे.
पत्रापत्री हा नाटकाचा एक आगळा वेगळा प्रयोग आहे. दृक-अविष्कार आणि अभिवाचन या नाट्यकलेच्या दोन अंगांमधून, पत्रा-पत्री रंगमंचावर सादर होते. तात्यासाहेब आणि माधवराव या दोन इरसाल मित्रांच्या व्यक्तीरेखा, अनुक्रमे प्रभावळकर आणि केंकरे आपल्या सशक्त अभिनयाने जिवंत करतात.
या दौऱ्याच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर ८-१० वर्षांनी पुन्हा अमेरिकेत येत आहेत.