धावते अनुभव
- Amol Bhagwat

- Feb 12
- 1 min read
Updated: Feb 13
२/१२/२०२५
श्री अमोल भागवत
:
धावण्याच्या आवडीमुळे जशी वेगवेगळी शहरं बघता आली, त्याचप्रमाणे अनेक प्रसंग बरेच काही शिकवून गेले.
एप्रिल महिन्याचा शेवटचा रविवार होता, आणि त्या आल्हाददायी सकाळी लुइविल मॅरेथॅानला सुरवात झाली. २६.२ मैलाचे अंतर पार करण्यासाठी माझ्या सारख्या अनेकांनी पहिले पाऊल टाकले.
मैलांचे फलक एक एक करून मागे पडत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली गर्दी उत्साह वाढवित होती. आता अर्ध्याहून अधिक अंतर पार झाला होता, रस्त्याच्या कडेची गर्दी विरळ झाली.हळूहळू शरीर आणि मेंदूचा झगडा सुरू झाला.
आता एका निसर्गरम्य ट्रेल मधून मॅरेथॅान पुढे जात होती.

तेवढ्यात माझ्यापुढे दोन धावकांचे संभाषण कानावर पडले. एक धावक दुसऱ्याला, ट्रेल भोवती असलेली स्ंदर घरं, पार्कात खेळणारी मुलं, झाडांवर आलेली कोवळी पानं आणि निरभ्र आकाश आणि त्यावरील कापसा सारखे दिसणारे ढग ह्याचे हुबेहुब वर्णन करीत होता.
हे संभाषण माझ्या मेंदुपर्यंत पोहचायला काही क्षण गेले, मी पटकन दोघांना निरखले आणि त्या दोघांना एकाच अंतरावर बाजुबाजुला ठेवणारी एक पट्टी दिसली.
मी शहारलो, कारण त्यातली एक व्यक्ती अंध होती.
ह्या काही सेकंदांचा कालावधी बरेच काही सांगून गेला आणि ते एैकत मी माझी मंरेथॅान यशस्वीरित्या पुर्ण केली.




Amazing!! Great story Amol.
थोडक्या शब्दात सांगितलेला पण एकदम मनाला भिडणारा अनुभव !!
निशब्द करणारा अनुभव आहे. असेच अजून अनुभव वाचायला आवडतील.
बोलकं आणि तरीही अंतर्मुख करणारी गोष्ट. छान लिहिले आहेस, अमोल!